Good News... दीपिका- रणवीर लागले कामाला; मुलांची नावंही ठरली

पाहा कधी होणार नव्या पाहुण्याची एंन्ट्री? 

Updated: Oct 17, 2021, 10:16 AM IST
Good News... दीपिका- रणवीर लागले कामाला; मुलांची नावंही ठरली

मुंबई : बॉलिवूडचा पॉवर कपल म्हणजे रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone). दोघांच्या लग्नाला आता 3 वर्ष पूर्ण होतील.  त्यामुळे हे कपल गुडन्यूज कधी देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एवढंच नाही तर अनेक वेळा दीपिकाच्या प्रेग्नेंसीबद्दल अफवा देखील पसरल्या होत्या. पण आता रणवीरने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे.

रणवीर सिंगने त्याच्या टीव्ही शोच्या पहिल्याच दिवशी मोठा खुलासा केला. शोमध्ये रणवीरने स्पर्धकांना सांगितले, 'तुम्हाली माहिती आहे, मी विवाहित आहे आणि आता मला 2-3 वर्षात मुले होतील. भाऊ, तुमची वहिनी इतकी सुंदर मुलगी होती? देवा अशीचं एक मुगली मला देखील दे.. माझं आयुष्य सेट होईल...'

एवढेच नाही तर रणवीर सिंगने हे रहस्य देखील उघड केले की तो त्याच्या भावी मुलांसाठी नावांची यादी देखील तयार करत आहे. तो म्हणाला, 'मी नावे शॉर्टलिस्ट करत आहे. मी तुमच्याकडून 'शौर्य' घेतल्यास तुम्हाला हरकत नाही का? ' 

रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रणवीर 83 चित्रपटात दिसणार आहे. रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय रणवीर सिंह रोहित शेट्टीसोबत 'सर्कस' चित्रपटातही दिसणार आहे. त्याचबरोबर 'जयेशभाई जोर्दार' आणि 'सूर्यवंशी' हे चित्रपटही रणवीरच्या आगामी चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहेत.