Ranveer Singh ला शर्टलेस पाहून अभिनेत्रीची घसरली जीभ, म्हणाली, सांभाळ तुझं टॉवेल!

अभिनेता रणवीर सिंगने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला.

Updated: Oct 16, 2021, 07:10 PM IST
Ranveer Singh ला शर्टलेस पाहून अभिनेत्रीची घसरली जीभ, म्हणाली, सांभाळ तुझं टॉवेल!

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रणवीर सिंग शर्टलेस दिसत आहे. तसेच तो घामाने भिजलेला आहे. रणवीरने त्याच्या या फोटोसह चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे. या प्रश्नाबरोबरच त्याने चार पर्यायही दिले आहेत.

आपला शर्टलेस सेल्फी शेअर करताना रणवीर सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले, "रणवीरला घाम का येत आहे? A. तो नुकताच स्टीम रूममधून आला आहे.  B. त्याचा रात्री टेलिव्हिजन डेब्यू आहे.  C. त्याची शारीरिक उष्णता खूप जास्त आहे. D. तो योगा प्रॅक्टीस करत होता. "

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांच्या आणि बॉलिवूड सेलेब्सच्या कमेंट

चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलेब्स देखील रणवीर सिंगच्या या फोटोवर आणि प्रश्नावर तीव्र टिप्पणी करत आहेत. रणवीरच्या फोटोवर टिप्पणी करताना पूजा हेगडेने लिहिले, "टॉवेल पडत आहे, पम्मी. काळजी घ्या."