मुंबई : द रॉकींग स्टार यशच्या 'KGF Chapter 2' चित्रपटाची क्रेझ रिलीजच्या 42 दिवसानंतरही कायम आहे. हा सिनेमा सर्वंच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर मॉनस्टर कमाई करत चाललाय. या सिनेमाची क्रेझ आणि कमाईची रफ्तार कोणताच चित्रपट रोखू शकला नाहीये.
केजीएफ सीझनच्या 2 रिलीज होऊन 42 दिवस म्हणजेच सहा आठवडे पुर्ण झालेत. मात्र या सहा आठवड्यानंतरही रॉकी भाईच्या सिनेमाची क्रेझ कायम आहे. बॉक्स ऑफिसवर त्याचा वेग थांबत नाही आहे. दररोज हा चित्रपट भरपूर कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही रॉकी भाई म्हणजेच यशचा उत्साह लोकांची डोकी उंचावत आहे. आता 'KGF 2' च्या कलेक्शनबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी सांगितले की, यशचा चित्रपट 'KGF Chapter 2' ने जगभरात 1229 कोटींचे कलेक्शन केले आहे. तसेच 'KGF Chapter 2' ने पाचव्या आठवड्यापर्यंत 1210 कोटी रुपये कमावले आहेत आणि सहाव्या आठवड्यात या सिनेमाने सुमारे 17 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सहाव्या आठवड्याची कमाई
दिवस 1 - 3.10 कोटी
दिवस 2 - 3.48 कोटी
दिवस 3 - 4.02 कोटी
चौथा दिवस - ४.६८ कोटी
दिवस 5 - 1.87 कोटी
दिवस 6 - 1.46 कोटी
एकूण - 1229.14 कोटी
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांना टाकले मागे
केजीएफ सीझनच्या 2 रिलीजनंतर असंख्य चित्रपट प्रदर्शित झाले, जसे (Ajay Devgan) अजय देवगणचा 'रनवे 34' (Runway 34) चित्रपटाने रफ्तार पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र हा जास्त काळ रनवे वर टीकू शकला नाही. टायगर श्रॉफची 'हिरोपंती 2' ही रॉकीसमोर फिकी ठरली. रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार' आणि कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) 'भूल भुलैया 2' हे सिनेमे देखील रॉकीची कमाई आणि क्रेझ भरकटवू शकला नाहीए.