श्री रेड्डीनंतर या अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचवर खुलासा

गेस्ट हाऊसवर बोलवून.... 

श्री रेड्डीनंतर या अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचवर खुलासा  title=

मुंबई : कास्टिंग काऊच या मुद्यावर बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत सगळीकडेच चर्चा आहे. कास्टिंग काऊचवर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजमंडळी आपलं मत स्पष्ट करत आहे. आता साऊथ स्टार अभिनेत्री श्री रेड्डीने टॉपलेस होऊन कास्टिंग काऊचवर भाष्य केलं होतं. आता तेलगु अभिनेत्रीने देखील मोठा खुलासा केला आहे. 

साऊथ फिल्ममध्ये सह - कलाकार असलेली अभिनेत्री अमानीने कास्टिंग काऊच या मुद्यावर आपल मत सांगितलं आहे. एका मुलाखती दरम्यान अमानीने सांगितलं की, तिने आपल्या करिअरच्या सुरूवातीला कास्टिंग काऊचला भरपूर जवळून पाहिलं आहे. अमानीने कास्टिंग काऊचवर पुढे सांगितलं आहे की, मला कायम नवीन प्रोडक्शन कंपनीकडून फोन येत असे. तेव्हा मला सांगितलं जात असे की, तू तुझ्या आईशिवाय गेस्ट हाऊसमध्ये भेटायला ये. मी त्या लोकांच्या बोलण्याला अगदी सहज ओळखलं होतं. तामिळ इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच होतं मात्र प्रतिष्ठित फिल्ममेकर आणि प्रोडक्शन कंपनीकडून कधीच असा प्रकार समोर आला नाही. 

असे फोन जास्त करून नव्या प्रोडक्शन हाऊसमधूनच येत असतात. अमानी लग्नानंतर मात्र या इंडस्ट्रीपासून दूर राहते. मात्र आता ती लवकरच सिनेमांत पदार्पण करणार आहे. अमानी या अगोदर अनेक तेलगू सिनेमांत दिसली आहे. अमानीच्या अगोदर श्री रेड्डी या अभिनेत्रीने भररस्त्यात कपडे उतरवून कास्टिंग काऊच विरोधात आवाज उठवला होता.