हा आहे 'संजू'च्या जीवनातील खरा विक्की कौशल

कोण आहे ही व्यक्ती?

हा आहे 'संजू'च्या जीवनातील खरा विक्की कौशल  title=

मुंबई : 'संजू' हा सिनेमा पाहिला असेल तर... हा सिनेमा फक्त रणबीर कपूरच्या पॉवरफुल परफॉर्मन्सवर आधारित नाही तर त्यापुढे ही तो आहे. फक्त रणबीर कपूरवर हा सिनेमा आधारलेला नाही तर दिग्दर्शक राजकुमार हिरानीने आणखी एका व्यक्तीवर आधारित हा सिनेमा आहे. 'कमली' हे कॅरेक्टर विक्की कौशलने साकारलं आहे. हे कॅरेक्टर संजय दत्तच्या अगदी जवळची व्यक्ती आहे. खऱ्या आयुष्यात संजय दत्तच्या आयुष्यातील ही अगदी जवळची व्यक्ती आहे. ही व्यक्ती आहे परेश गेहलानी. याला आता संजू बाबासोबत मुंबईत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तचा अगदी जवळचा मित्र आहे ज्याने बाबाला कायम साथ दिली आहे. हा मित्र कधीच मीडियासमोर आला नाही. 'संजू' या सिनेमाच्या माध्यमातून फक्त त्याच आयुष्य जगासमोर आलं असं नाही तर त्याचे अगदी जवळचे मित्र देखील जगासमोर आले. ज्याचं नाव आहे परेश गेहलानी. 

परेश काही वेळापासून मुंबईत राहत असून संजय दत्तसोबत काही काळ घालवत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेशने देखील 'संजू' सिनेमाकरता पूर्ण सहयोग दिला आहे. परेशची इच्छा आहे की, हा सिनेमा भरपूर लोकांपर्यंत पोहोचावा. आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळावा. तसेच संजूच्या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी देखील परेश संजय दत्तसोबत होते.