अनुराग कश्यपचा तनुश्री दत्ताला पाठिंबा, पण ही अभिनेत्री भडकली

अनुरागवर कोण भडकलं? 

अनुराग कश्यपचा तनुश्री दत्ताला पाठिंबा, पण ही अभिनेत्री भडकली

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांच्या विरोधात छेडछाडीचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शवला. याप्रकरणात आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने तनुश्री दत्ताला पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर मात्र एका अभिनेत्रीने चांगले खडेबोल लगावले आहेत. 

डीएनएने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री पायल रोहतगीने 2011 'शंघाई' सिनेमाकरता स्क्रिन टेस्ट दिली होती. तेव्हा फिल्म मेकर दिबाकर बॅनर्जीने पायलसोबत सेक्सुअल हरॅशमेंटची मागणी केली. या प्रकारानंतर जेव्हा पायले दिग्दर्शकावर चुकीचे व्यवहार करण्याबाबत आरोप लावला तेव्हा अनुराग कश्यप आणि सुधीर मिश्राने तिला मानसिक रूग्ण असल्याचं सांगितलं. आणि आता तनुश्रीकरता अनुराग कश्यप समर्थन देत आहे. आता या प्रकरणानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच नाव यामध्ये गुंतल आहे. 

नाना पाटेकर यांच्यानंतर तनुश्री दत्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर देखील गंभीर आरोप लावले आहेत. तनुश्रीने सांगितलं की, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'चॉकलेट' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान तनुश्रीला कपडे उतरवून डान्स करण्यासाठी सांगितलं होतं. 

आतापर्यंत या कलाकारांनी तनुश्रीला दिलं समर्थन 

या प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकारांनी तनुश्रीला पाठिंबा दिला आहे. फरहान अख्तर, प्रियंका चोप्रा, हंसल मेहता, ट्विंकल खन्ना, रवीना टंडन यासारख्या अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x