शबाना आझमींच्या अपघातानंतर भारतीय जवानाचे सर्वच स्तरातून कौतुक

शबाना आजमींच्या मदतीसाठी धावून आले भारतील जवान  

Updated: Jan 19, 2020, 09:36 AM IST
शबाना आझमींच्या अपघातानंतर भारतीय जवानाचे सर्वच स्तरातून कौतुक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी शनवारी झालेल्या अपघातात गंभीर रित्या जखमी झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर देखील होते. पण सुदैवाने त्यांना काहीही झालेले नाही. जावेद अख्तर यांचा वाढदिवस साजरा करून परतत होते. अपघातानंतर त्यांना तात्काळ पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

त्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आहे. याच दरम्यान एका भारतीय जवानाला सोशल मीडियावर सैल्यूट करण्यात येत आहे. त्यांना सेल्यूट करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जेव्हा मुंबई-पुणे महामार्गावर त्यांचा अपघात झाला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एक जवान त्यांच्या मदतीसाठी तात्काळ धावून आला. 

सध्या त्या भारतीय जवानाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. शिवाय त्यांच्या फोटोंवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तर शबाना आजमींच्या मदतीसाठी अखेर भारतीय जवान पुढे आला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. 

सध्या त्यांची परिस्थिती स्थिर आहे. त्यांची भेट घेण्यासाठी अनेक कलाकार कोकिलाबेन रूग्णालयात येत आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यतून चाहते चिंता व्यक्त करत आहेत, तर काही आक्षेपार्ह लिहित करावं तसं भरावं... या आशयाचे ट्विट केले आहे. 

एकंदरच सोशल मीडियाच्या माध्यमातून माणुसकीच्या नावावर जिथे संताप आणि घृणेच्या भावनेचं दर्शन झालं तिथेच या समाजातील माणुसकी जपणाऱ्यांनी पुढाकार घेत चुकीच्या गोष्टींना पुरतं ठेचण्याचा प्रयत्न केला असं म्हणणं गैर ठरणार नाही.