तैमूर, जहांगीरनंतर आता सपना चौधरीच्या मुलाचं नाव चर्चेत

या पराक्रमी आणि स्वाभिमानी राजाच्या नावाने ओळखला जाणार सपना चौधरीचा मुलगा

Updated: Oct 5, 2021, 01:03 PM IST
तैमूर, जहांगीरनंतर आता सपना चौधरीच्या मुलाचं नाव चर्चेत title=

मुंबई : डान्स म्हटलं की, सपना चौधरी हे नाव प्रत्येकाच्या मनात अगदी सहज येतं. लोक तिला देसी क्वीन, डान्सिंग क्वीन म्हणून ओळखतात. हरियाणाची क्वीन सिंगर आणि डान्सर सपना चौधरी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. फोटो असो किंवा व्हिडीओ, तिची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर लगेच व्हायरल होते. आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे तिच्या मुलाची. सपनासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. कारण तिच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. 

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिने  मुलाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण व्हिडिओमध्ये तिने मुलाचा चेहरा दाखवला नाही. पण तिने मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. त्यामुळे तैमूर आणि जहांगीर नंतर आता सपना चौधरीच्या मुलाचं नाव चर्चेत आलं आहे. सपना पहिल्यांदा तिच्या मुलाचं नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सपना म्हणाली, 'माझ्या आणि माझ्या चाहत्यांकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...  @porusofficial'  सपनाच्या मुलाचं नाव पोरस आहे. पुरु (पोरस) हा सिकंदराच्या काळात पूर्व पंजाबावर राज्य करणारा पुरुवंशीय राजा होता. सपनाने शेअर केलेला मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सपनाच्या चाहत्यांकडून तिच्या मुलावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

सपना चौधरीच्या हरियाणवी गाण्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. यूट्यूबवर अनेकदा लोक तिच्या नृत्याचा आणि गाण्यांचा आनंद घेतात.  सपना हरियाणवी  गाण्यांमधून लोकप्रिय झाली आहे, पण तिच्या नृत्याचे चाहते केवळ देशातच नाही तर परदेशातही आहेत. सोशल मीडिया स्वप्न हे एक असे गाणे आहे, जे लोकांना पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते.