close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चुकीला माफी नाहीच...विवेक ओबेरॉयला त्या ट्विटमुळे आणखी एक फटका

चॅरिटी ऑर्गेनाइजेशनमधून विवेक बाहेर...

Updated: May 22, 2019, 02:43 PM IST
चुकीला माफी नाहीच...विवेक ओबेरॉयला त्या ट्विटमुळे आणखी एक फटका

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनवर वादग्रस्त मीम शेअर केल्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका केल्या जात आहेत. दरम्यान, त्याने आपल्या ट्विटवर माफी मागितली. परंतु त्याच्या समस्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. ऐश्वर्या रायवर असंवेदनशील ट्विट केल्यानंतर एका चॅरिटी ऑर्गेनाइजेशनने (स्माइल फाउंडेशन) विवेक ओबेरायला आपल्या इव्हेंटमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

'विवेक ओबेरॉयच्या सोशल मीडिया पोस्टमुळे स्माइल फाउंडेशनने विवेकसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याचं सांगतलं. विवेकला DLF Promenad मध्ये ओडिशा फॅनी चक्रीवादळासाठी निधी उभारणीसाठी हिस्सा बनायचं होतं. आमची संस्था महिला सशक्तीकरणासाठी काम करते. विवेक ओबेरॉयची पोस्ट आमच्या विचारधारेशी जुळत नाही' असं स्माइल फाउंडेशनने म्हटलं आहे.

विवेकने पोस्ट केलेल्या फोटोनंतर आधी, तो हे ट्विट डिलीट करणार नसून माफीही मागणार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु 24 तासांमध्येच झालेल्या टीकांनंतर विवेकने ट्विट डिलीट करत माफीही मागितली. 'अनेकदा एखादी गोष्ट एखाद्याला फनी वाटते तर दुसऱ्याला वाटत नाही. मी 10 वर्षांत जवळपास दोन हजार मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम केलं आहे. मी कोणत्याही महिलेला अपमानित करण्याबाबत विचारही करु शकत नाही. माझ्या मीममुळे जर कोण्त्याही महिलेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. ट्विट डिलीटेड.' असं म्हणत विवेकने फोटो पोस्ट केलेलं ट्विट डिलीट केलं.

सोनम कपूर, मधुर भंडारकर, अनुपम खेर, यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी विवेकवर सडकून टीका केली आहे. अमिताभ बच्चन यांनीही विवेकला साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला.  

विवेकने ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन, सलमान खान आणि तो स्वत: असलेल्या फोटोजचं एक मीम पोस्ट केलं होतं. त्या ट्विटनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. त्याच्या या ट्विटचे गंभीर पडसाद उमटले असून त्याच्या या कृतीनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीसही पाठवली होती.