ट्विटरने कंगनाला बॅन केल्यानंतर 'या' ऍपच्या फाऊंडरकडून स्वागत

कंगनाचं या ऍपच्या फाऊंडकरकडून स्वागत 

Updated: May 6, 2021, 01:21 PM IST
ट्विटरने कंगनाला बॅन केल्यानंतर 'या' ऍपच्या फाऊंडरकडून स्वागत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतचं नुकतंच ट्विट अकाऊंट सस्पेंड केलं आहे. कंगनाने सोशल मीडिया पॉलिसीची उल्लंघन केलं आहे. अशातच कंगानाला एका नव्या ऍपचा आधार मिळाला आहे. या ऍपच्या फाऊंडरकडूनच सोशल अकाऊंटची ऑफर आली आहे. 

ऍपच्या फाऊंडरने लिहिली ही गोष्ट 

अप्रमेय राधाकृष्णने कंगनाचं पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की,'हे कंगना रानौतचं पहिलं कू आहे. ती बरोबर बोलत आहे. कू तिला तिच्या घरासारखंच आहे. बाकी सगळ्या गोष्टी भाड्याच्या आहेत.' कंगनाने फेब्रुवारी महिन्यात कू ऍपवर अकाऊंट ओपन केलं होतं. तेव्हा लिहिलेल्या पहिल्या पोस्टला फाऊंडरने शेअर केलं होतं. 

कंगनाने लिहिली होती ही पोस्ट 

कंगनाने कू ऍपवर पहिली पोस्टमध्ये लिहिलं की, 'धाकड' सिनेमाचा उल्लेख केला. 'सगळ्यांना नमस्कार. रात्री काम सुरू आहे. आणि धाकडच्या क्रू ला ब्रेक मिळाला आहे. का नाही कू करावे. ही माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे. लवकरच याची ओळख होईल. मात्र भाड्याचे घर हे भाड्याचे असते. आपलं घर आपलं वाटतं. '

गना रानौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असणाऱ्या कंगनावर ट्विटरचे नियम फॉलो न करण्याचे आरोप लावण्यात आला आहे. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर ट्विटरवर #KanganaRanaut हा हॅशटॅग ट्रेंड झाला. आता कंगनाने या सगळ्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगनाने म्हटलं की,'ट्विटरने कायमच सिद्ध केलं आहे की, त्याचा जन्म अमेरिकेत झाला. ते सफेद व्यक्ती आहेत. भारतात राहणाऱ्यांना गुलामच बनवण्याचा प्रयत्नात असतात. ते तुम्हाला सांगणार की, तुम्ही काय विचार करता, काय बोलता आणि काय करायचं आहे. माझ्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यामधून मी माझा आवाज अधिक स्पष्टपणे मांडू शकते.'