अशोक सराफांची सोशल मीडियावर एन्ट्री

2020 रोजी चाहत्यांना खास भेट 

Updated: Jan 5, 2020, 10:55 AM IST
अशोक सराफांची सोशल मीडियावर एन्ट्री  title=

या अनेक सेलिब्रिटी चाहत्यांची संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. या माध्यमातून कलाकाराच्या खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही गोष्टींशी चाहते कनेक्ट राहतात. या प्लॅटफॉर्मपासून आतापर्यंत दूर राहिलेल्या विनोदी भूमिका साकारून आपल्या टायमिंगसाठी लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी एन्ट्री घेतली आहे. 

अशोक सराफ यांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सुरूवात केली आहे. 2020 रोजी अशोक सराफांच्या चाहत्यांनी खास भेट म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

नव्या दशकाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा!! माझा नवा डिजिटल प्रवास सुरु झालाय माझ्या आणि हो धनंजय माने इथेच @ashoksarafofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवर राहतात.. #RealAshokSaraf #Prawaas

A post shared by Ashok Saraf (@ashoksarafofficial) on

अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा 'प्रवास' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. फेसबुकवर ashoksarafofficial या नावाने त्यांचं अकाऊंट असून इन्स्टाग्रामवर #realashoksaraf या नावाने त्यांचं खातं आहे. विशेष म्हणजे त्यांनी २ जानेवारी २०२० रोजी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत ‘हो. धनंजय माने इथेच राहतात’, असं सांगितलं. 

नुकतंच अशोक सराफ यांनी या सिनेमाचं दुसरं पोस्टर लाँच केलं आहे. 'प्रवास'या सिनेमाचं ट्रेलर दोन दिवसांत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दोघही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एवढंच नव्हे तर बऱ्याच वर्षांनंतर दोघेही एकत्र काम करत आहेत.