ऐश्वर्या रायच्या 'निक नेम'चा खुलासा

या नावाने मारतात हाक 

ऐश्वर्या रायच्या 'निक नेम'चा खुलासा  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या निक नेमने ओळखले जातात. जसं करीनाला - बेबो तर करिश्माला - लोलो या नावाने ओळखलं जातं. म्हणून ऋतिक रोशनला घरी डुग्गू या नावाने हाक मारली जाते. तर गोविंदाला चिची हे नाव अतिशय लोकप्रिय आहे. चाहत्यांना देखील जाणून घ्यायचं असतं की, आपल्या लोकप्रिय कलाकारांना कोणत्या नावाने हाक मारली जाते. 

हल्लीच ऐश्वर्या राय बच्चनच्या निक नेमचा खुलासा झाला आहे. ऐश्वर्याच्या नणदेचा नवरा श्रीराम रायने सांगितलं की, ऍशला घरी कोणत्या नावाने हाक मारली जाते. खरं म्हणजे श्रीराम राय यांना कुणीतरी विचारलं की, तुम्ही आपल्या मुलांना कसे सांगता की, त्यांची मामी ऐश्वर्या किती फेमस आहे? 

यावर त्यांनी सांगितलं की, माझ्या घरी हा विषय कधीच झाला नाही. ऍशला घरी मुलं 'गुलू मामी' या नावाने हाक मारतात. ऐश्वर्याचा आताचा सिनेमा 'फन्ने खान' हा होता. या सिनेमात तिच्यासोबत अनिल कपूर देखील होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही. 

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या एका NGO च्या कार्यक्रमात दिसले. यावेळी ऐश्वर्या रायने वडिलांच्या वाढदिवसादिवशी हा कार्यक्रम योजला होता. यामधून स्माइल ट्रेन आणि त्याच्या मेडिकल फॅक्टरबाबत लोकांना सांगायचं आहे. 
 
ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'गुलाब जामून' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ऐश्वर्यासोबत अभिषेक बच्चन देखील असणार आहे. हा सिनेमा अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला आहे. 8 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र स्क्रिनवर दिसणार आहेत.