'कमी वयाच्या मुलावर कधी...' अभिषेकबद्दल ऐश्वर्याच मोठ वक्तव्य

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यातील मोठी गोष्ट अखेर समोर...  

Updated: Jul 1, 2022, 11:53 AM IST
'कमी वयाच्या मुलावर कधी...' अभिषेकबद्दल ऐश्वर्याच मोठ वक्तव्य title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. चाहते या कपलचे  त्यांच्या नवीन फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात.  आता देखील एका गोष्टीमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक चर्चेत आले आहेत. 

एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या रायसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना अभिषेक बच्चनने सांगितले की, 1997 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये 'और प्यार हो गया' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले.  तेव्हा अभिषेक तिथे प्रोडक्शन बॉय म्हणून काम करत होता.

पहिल्या भेटीनंतर दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, पहिल्या भेटीनंतरच तो ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. एका मुलाखतीत ऐश्वर्या रायने स्वत: कबूल केले होते की, तिला अभिषेकवर कधीच क्रश नव्हता. अभिनेत्याशी लग्न झाल्यावरही तिला असं काही वाटलं नाही.

यावर स्पष्टीकरण देताना ऐश्वर्या म्हणाली, शाळेत किंवा कॉलेजमध्ये मला माझ्यापेक्षा लहान मुलावर कधीही प्रेम नव्हतं. अभिषेक वयाने ऐश्वर्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. पण, दोघेही आज एकत्र आनंदी आयुष्य जगत आहेत.

20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात अडकले. दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के', 'कुछ ना कहो', 'गुरु' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. दोघेही आज बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक मानले जातात.