ऐश्वर्या पुन्हा गरोदर; नेटकऱ्यांना पडला प्रश्न

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक व्हिडिओ व्हायरल 

Updated: Nov 13, 2019, 04:34 PM IST
ऐश्वर्या पुन्हा गरोदर; नेटकऱ्यांना पडला प्रश्न  title=

मुंबई : ऐश्वर्या राय नुकतीच मुकेश अंबानींच्या हाऊस पार्टीत दिसली. या पार्टीत ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबत दिसली. अंबानी कुटुंबियांनी नयनतारा कोठारी यांच्या मुलीच्या प्रि-वेडिंग पार्टीत अनेक स्टार-स्टड देखील उपस्थित होते. ऐश्वर्याने यावेळी लाल रंगाचा अनारकली सूट घातला होता. यावेळी चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारून ट्रोल केलं. 

ऐश्वर्या रायचे फोटो बघून असं वाटतं की, ती प्रेग्नेंट आहे. या कारणामुळे चाहत्यांनी तिच्या या फोटोखाली प्रश्न विचारले आबेत. काहींना असं वाटतं की ती ओढणीमागे आपली प्रेग्नेंसी लपवत आहे. मात्र आतापर्यंत ऐश्वर्या राय बच्चन किंवा बच्चन कुटुंबियांकडून कोणतही उत्तर आलेलं नाही. 

Aishwarya Rai Bachchan

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ऐश्वर्या बीचवर दिसत असून गोव्यातील आहे. या ठिकाणी ऍश आणि अभिषेक सुट्यांवर गेले होते. या व्हिडिओपासूनच ऐश्वर्या गरोदर असलेल्या चर्चांना उधाण आलं होतं. 

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच 2007 मध्ये 20 एप्रिल रोजी लग्न केलं. लग्नाच्या 12 वर्षानंतरही या दोघांच नातं अतिशय चांगल आहे. अनेकदा या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण आल्याची अफवा पसरली होती मात्र काही दिवसांनी हे सगळं खोटं असल्याचं समोर आलं आहे. ऐश्वर्याने 2011 साली आराध्याला जन्म दिला. 

ऐश्वर्या या अगोदर 'फन्ने खां' या सिनेमात दिसली. या सिनेमात अनिल कपूर आणि राजकुमार रावसोबत काम केलं आहे. ऐश्वर्याचा 'गुलाब जामुन' हा आगामी सिनेमा असून ती अभिषेकसोबत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे.