Aishwarya Rai नं अखेर Aaradhya Bachchan च्या प्रकृतीसंदर्भातील Fake News वर सोडलं मौन, म्हणाली...

Aishwarya Rai On Aaradhya Bachchan Fake News Case : सोशल मीडियावर बच्चन कुटुंबातील सदस्यांबद्दल अनेक बातम्या रोज व्हायरल होतं असतात. त्यातील काही बातम्यांमध्ये तथ्य असतात. पण आराध्या बच्चन हिचा आरोग्याची बातमी 2 यूट्यूब चॅनल आणि एका वेबसाइटने दिली अन् मग 

Updated: Apr 26, 2023, 11:57 AM IST
Aishwarya Rai नं अखेर Aaradhya Bachchan च्या प्रकृतीसंदर्भातील Fake News वर सोडलं मौन, म्हणाली... title=
aishwarya rai reaction on daughter aradhya bachchan fake news case Ponniyin Selvan 2 trailer launch

Aishwarya Rai On Aaradhya Bachchan Fake News Case :  महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) पासून जया बच्चन(Jaya Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek  Bachchan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai), श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan Nanda) आणि नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. बच्चन कुटुंबातील सदस्यांचे व्हिडीओ, फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. या कुटुंबातील प्रत्येक घडामोडी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. म्हणून की काय रोज त्यांचा बद्दल काही ना काही बातम्या येतं असता. 

आराध्या बच्चनची हायकोर्टात धाव

हो 11 वर्षांच्या आराध्या बच्चनने फेक न्यूजबाबात दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. आराध्या ही एक प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. त्याचा तब्येतीबद्दल 2 यूट्यूब चॅनल आणि एका वेबसाइटने खोट्या बातमी प्रसिद्ध केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असता हायकोर्टाने यूट्यूबला चांगलेच फटाकरले. 

अखेर आई ऐश्वर्याने मौन सोडलं...

एका कार्यक्रमाच्या वेळी ऐश्वर्याला फेक न्यूजबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली की, हे खूप चांगल आहे की मीडियामध्ये असा एक मेंबर आहे जो हे ओळखतो की खोट्या बातम्या पण असतात. ही गोष्ट आम्हाला आशा देते की, असा बातम्यांना प्रोत्साहन दिल जात नाही आहे. बनावट बातम्यांच्या नकारात्मक प्रभावाची तुम्ही सुज्ञपणे ओळख करून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. 

मुंबईत 'पोनीं सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2 trailer launch ) च्या प्रमोशनदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन आली होती. त्यावेळी मीडियाने तिला खोट्या बातम्यांविषयी विचारलं. 

कोर्टाने फटकारले 

त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टाने आराध्याविषयी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशी बातमी असेल तर ती काढून टाकण्याचे आदेश दिली होते. आराध्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी खोटे दावे करणारे कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ किंवा आर्टिकल असतील तर तेही ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश दिले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

आराध्या  मुंबईच्या धीरुभाई अंबानी इन्टरनॅशनल शाळेत शिकते. ती अनेक वेळा तिच्या आईसोबत अनेक कार्यक्रमात दिसून आली. नुकतीच आराध्या ऐश्वर्यासोबत विमानतळावर कॅमेऱ्यात कैद झाली.