छोटा ब्लाऊज घालून सासऱ्यांसोबत बाहेर जाणं ऐश्वर्याला पडलं महागात, दिसली अशा अवस्थेत

 तिच्या स्टाईलमध्ये अजिबात बदल झालेला नाही.

Updated: Feb 9, 2022, 05:05 PM IST
छोटा ब्लाऊज घालून सासऱ्यांसोबत बाहेर जाणं ऐश्वर्याला पडलं महागात, दिसली अशा अवस्थेत title=

मुंबई : ऐश्वर्या राय हिचं सौंदर्या पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे अशक्य आहे. कारण ही 48 वर्षीय अभिनेत्री आजही आपल्या ग्लॅमरने सगळ्यांचं लक्षवेधून घेताना दिसते, वयाच्या या टप्प्यातही ऐश्वर्या राय बच्चन अप्रतिम दिसते, ती बॉलिवूड सिनेमे आणि लाईमलाईटपासून जरी दूर असली तरी तिच्या स्टाईलमध्ये अजिबात बदल झालेला नाही.

हेच एक कारण आहे की, ऐश्वर्याची गणना नेहमीच फॅशन फॉरवर्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. अगदी साध्या पांरपारिक कपड्यांपासून ते वेस्टर्न आऊटफिटपर्यंत प्रत्येक लूकमध्ये ऐश्वर्या जबरदस्त दिसते. आणि चर्चेचा विषय ठरते. 

पण जेव्हा ती एखाद्या कार्यक्रमाला जाते तेव्हा तिने केलेला भारतीय लूक पाहून असा पोशाख घालायला कंटाळा करणारे लोकही पुन्हा एकदा पारंपारिक लूकच्या प्रेमात पडतात. असाच अभिनेत्रीचा लूक पहायला मिळाला, जेव्हा ती सासरच्या मंडळींसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.

वास्तविक, हा संपूर्ण किस्सा 2010 सालचा आहे, जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाली होती.

यादरम्यान ऐश्वर्याने खूप वेगळा लूक कॅरी केला होता, जो बोल्ड आणि रिव्हिलिंग तसेच अतिशय ट्रेंडी होता. या कार्यक्रमासाठी, ऐश्वर्याने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनची क्लासिक साडी निवडली.

यादरम्यान ऐश्वर्या राय बच्चनने रॉयल ब्लू कलरची साडी परिधान केली होती, जी पूर्णपणे नेट-सॅटिन सिल्क आणि मखमली सारख्या मिश्र फॅब्रिकमध्ये बनलेली होती. 

ऐश्वर्याने या अतिशय सेक्सी दिसणाऱ्या साडीसोबत मॅचिंग ब्लाऊज घातला होता. जो वेलवेटच्या कपड्यांचा होता. साडीप्रमाणे ब्लाऊजवर एम्ब्रॉयडरी नव्हती, पण बोल्ड कट्सने त्यात ग्लॅमर जोडले गेले. ब्लाउजचा पॅटर्न अगदी शॉर्ट होता. त्यामुळे ऐश्वर्याने साडीचा पदर खांद्यावर घेतला. तिने पदर आपल्या शरीराभोवती गुंडाळून तो लूक अगदी साधा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती एका कार्यक्रमाला पोहोचली होती. 

तिने स्वत:चा लूक अगदी बदलून टाकला. बोल्ड लूकला तिने साध्या आऊटफिटमध्ये बदललं.