ऐश्वर्याने अभिषेकसोबत काम करण्यास दिला नकार

बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर कपल म्हणून ओळख असणारी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 5, 2018, 10:30 AM IST
ऐश्वर्याने अभिषेकसोबत काम करण्यास दिला नकार

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर कपल म्हणून ओळख असणारी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.

ऐश्वर्याने दिला नकार

काही दिवसांपासून दोघे एकत्र सिनेमात काम करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण आता यावर पूर्णविराम लागला असल्याची माहिती आहे. ऐशने अभिषेकसोबत काम करण्यास नकार दिला आहे. ऐश्वर्याला अभिषेक सोबत सिनेमात काम नाही करायचंय.

अभिषेक होता तयार

शैलेश आर सिंह त्यांच्या आगामी सिनेमात या दोघांसोबत काम करण्याचा विचार करत होते. पण ऐश्वर्याने त्याला नकार दिला आहे. अभिषेक काम करण्यासाठी तयार होता. ऐश्वर्याला सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल हवा होता. सध्या यावर चर्चा सुरु असल्याचं बोललं जातंय. पण ऐश्वर्याने सिनेमा करण्यास नकार दिल्याचं देखील आता समोर आलं आहे. आता पाहावं लागणार आहे की, काय 8 वर्षानंतर पुन्हा ही जोडी सिनेमात एकत्र दिसणार का?