Aishwarya च्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीला; 'या' व्यक्तींवर संशय

Aishwaryaa Rajinikanth : रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने तेनमपेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली तिच्या चेन्नईतील घरातील लॉकरमधून 60 तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेलाचा दावा केला. 

Updated: Mar 20, 2023, 12:16 PM IST
Aishwarya च्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीला;  'या' व्यक्तींवर संशय title=
Aishwaryaa Rajinikanth files complaint after 60 sovereigns of jewellery

Aishwaryaa Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत त्यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतच्या आगामी ‘लाल सलाम’ (Lal Salam) या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहेत. त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात व्यस्त आहे. याचदरम्यान ऐश्वर्या रजनीकांत सोबत एक घटना घडली असून यासंबंधित ऐश्वर्याला तेनमपेट पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची वेळ आली. नेमकं ऐश्वर्या रजनीकांत सोबत काय घडलं सविस्तर जाणून घेऊया.... 

  दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) हिने तेनमपेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  कारण ऐश्वर्या यांच्या चेन्नईतील घरातील लॉकरमधून 60 तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने गायब झाल्याचा दावा केला आहे. मौल्यवान वस्तूंची किंमत 3.60 लाख रुपये असून 2019 मध्ये बहीण सौंदर्याच्या लग्नासाठी तीने दागिने वापरले होते. एफआयआरच्या प्रतिनुसार, ऐश्वर्याने दागिने लॉकरमध्ये ठेवले होते आणि ते तिच्या घरातील काही नोकरांना माहीत होते. तेनमपेट पोलिसांनी भादंवि कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ऐश्वर्याला नोकर आणि ड्रायव्हरवर संशय

ऐश्वर्या रजनीकांत सध्या तिचा आगामी चित्रपट लाल सलामच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगसाठी अभिनेत्री तामिळनाडूतील विविध शहरांना भेट देत आहे. याच दरम्यान ऐश्वर्याच्या घरी चोरीची घटना घडली असून दागिन्यांच्या चोरीप्रकरणी तेनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने तक्रारीत नमूद केले आहे की, शेवटचे दागिने 2019 मध्ये पाहिले होते जेव्हा तिची बहीण सौंदर्याच्या लग्नात ते घातले होते. लग्नानंतर तिने हे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते.

2021 मध्ये लॉकर तीन ठिकाणी हलवण्यात आले. 21 ऑगस्ट 2021 मध्ये लॉकर इतर घरगुती वस्तूंसह तिच्या माजी पती धनुषच्या सीआयटी नगर येथील फ्लॅटमध्ये नेण्यात आले. नंतर सप्टेंबर 2021 मध्ये सेंट मेरी रोड, चेन्नई येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये हलवण्यात आले. एप्रिल 2022 मध्ये हे लॉकर त्यांच्या पोस गार्डन निवासस्थानी हलवण्यात आले. तर लॉकरच्या चाव्या सेंट मेरी रोड येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये होत्या. 10 फेब्रुवारी 2023  ऐश्वर्याने लॉकर उघडले तेव्हा लग्नाच्या 18 वर्षानंतर तिने जमा केलेले काही दागिने गायब असल्याचे पाहून तिला धक्काच बसला. 

वाचा: अमिताभ बच्चन यांनी दिली तब्येतीविषयी माहिती म्हणाले, 'माझ्या प्रकृतीसाठी...'! 

डायमंड सेट, प्राचीन सोन्याचे तुकडे, नवरत्नम सेट, बांगड्या आणि सुमारे 60 तोळे सोने असा सुमारे 3.60 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेले. तिच्या तक्रारीत ऐश्वर्याने लिहिले आहे की, तिला तिची मोलकरीण ईश्‍वरी, लक्ष्मी आणि तिचा ड्रायव्हर, व्यंकट यांच्यावर संशय होता. ती दूर असतानाही अनेकदा सेंट मेरी रोड येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये येत होती. पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान ऐश्वर्या रजनीकांतच्या लाल सलाम या चित्रपटातून दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रजनीकांत कॅमिओच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अधिक माहिती लवकरच समोर येईल.