अजय देवगनच्या रेड सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित....

 बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित सिनेमाचे रेडचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 17, 2018, 09:25 PM IST
अजय देवगनच्या रेड सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित....

नवी दिल्ली : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित सिनेमाचे रेडचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टरवर अजयचा दमदार लूक दिसत आहे. पोस्टरवर हिरो हमेशा युनिफॉर्म में नही आते, असे कॅप्शन दिसत आहे. हे पोस्टर ट्रेंड एनालिस्ट तरण आदर्शने ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.

पहा पोस्टर...

रेड सिनेमात अजय देवगन लखनऊचे इनकम टॅक्स ऑफिसर अमेय पटनायक ही व्यक्तिरेखा साकारत आहे. जो काळा पैसा लपवणाऱ्या देशातील गद्दारांच्या घरी धाड टाकत असतो. हा सिनेमा १६ मार्चला प्रदर्शित होईल.

सिनेमाबद्दल...

या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता करत आहेत. या सिनेमात अजयसोबत इलियाना डिक्रूज देखील आहे. 'बादशाहो'मध्ये ही अजय-इलियानाची जोडी पाहायला मिळाली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मात्र 'बादशाहो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसे चांगले प्रदर्शन करु शकला नाही. त्यामुळे रेड सिनेमाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.