'हर एक मराठा मे छुपा है लाख मराठा' 'तान्हाजी'ची गर्जना राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये घुमली

तान्हाजी या चित्रपटाला तब्बल दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

Updated: Jul 22, 2022, 05:40 PM IST
'हर एक मराठा मे छुपा है लाख मराठा' 'तान्हाजी'ची गर्जना राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये घुमली title=

National Flim Awards 2022: 68 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची घोषणा झाली असून 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाने या पुरस्कारांवर वेगळी मोहोर उमटवली आहे. 'तान्हाजी' या चित्रपटाला तब्बल दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

अभिनेता अजय देवगण याला 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या चित्रपटासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच याच चित्रपटाला सर्वात्कृष्ट मनोरंजन देणारा चित्रपट म्हणून पण विजेता ठरणार आहे. तान्हाजी मालसूरे यांच्या पराक्रमावर आधारित, त्यांचे जीवन दर्शन दाखवणारा चित्रपट आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका अभिनेता शरद केळकर यांनी केली होती तर तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भुमिका काजोल यांनी साकारली होती. 

हा चित्रपट 2020 च्या जानेवारीच्या महिन्यात प्रदर्शित झाला होता आणि दीपिकाचा 'छपाक' हा सिनेमा एकाचवेळी प्रदर्शित होऊनही 'तान्हाजी' या चित्रपटाने तीनशे कोटींपेक्षाही जास्त गल्ला भरवला होता. 

जेव्हा 'तान्हाजी' चित्रपट सापडला होता वादाच्या भोवऱ्यात...
ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटावरून अनेक वादही झाले. या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंबद्दल चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप गोडवलीच्या गावकऱ्यांनी होता. तसेच या चित्रपटाच्या नावावरूनही बराच गादारोळ माजला होतो. तानाजी नाही तर तान्हाजी असे तान्हाजी मालुसरेंचा  उल्लेख आहे असे अनेकांकडून सांगण्यात आले होते. चित्रपटात तान्हाजी यांचे मूळ गाव असलेल्या गोडवलीचा उल्लेख नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.