अभिनेत्याची राहत्या घरी आत्महत्या; वडिल दाखल करणार FIR

राहत्या घरी लावून घेतला गळफास 

Updated: Oct 3, 2020, 09:10 AM IST
अभिनेत्याची राहत्या घरी आत्महत्या; वडिल दाखल करणार FIR  title=

मुंबई : मुंबईत आणखी एका अभिनेत्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. मुळचा बिहारमधील मुजफ्फरपुरमध्ये राहणारा अभिनेता अक्षय उत्कर्षने मुंबईत गळपास लावून घेतली. या प्रकरणाविरोधात अभिनेत्याच्या वडिलांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं. 

अक्षत मुंबईतील अंधेरीतील सुरेश नगरमधील गोकुळ इमारतीत मेरठच्या स्नेहा चौहानसोबत लिव इनमध्ये राहत होता. अक्षतच्या वडिलांनी सांगितलं की, २७ सप्टेंबर रोजी त्याचा फोन आला होता. त्याला काही तरी आम्हाला सांगायचं होतं. तेव्हा आम्ही श्रीकृष्ण मालिका पाहत होते. त्याने त्यानंतर फोन करायला सांगितलं. 
मालिका संपल्यावर आम्ही त्याला फोन केला मात्र त्याने तो उचलला नाही. त्यानंतर स्नेहाने त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती दिली. 

ऑगस्ट २०१८ मध्ये अक्षत मुंबईत आला. गेल्या सहा महिन्यापासून तो स्नेहासोबत राहात आहे. अक्षतच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र पोलिसांना अक्षतचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला.

अक्षतच्या आत्महत्या प्रकरणात अभिनेता शेखर सुमन यांनी ट्विट केलं आहे. अक्षतने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. कुटुंबियांनी ही हत्या वाटत आहे. पण हा मुद्दा फार उचलला जाईल की नाही यात शंका आहे. कारण तो स्ट्रगलर होता आणि त्याची सुंदर गर्लफ्रेंड नाही.