सई लोकूर लवकरच अडकणार विवाहबंधनात, शेअर केले फोटो

सईने शेअर केले खास फोटो 

Updated: Oct 2, 2020, 03:21 PM IST
सई लोकूर लवकरच अडकणार विवाहबंधनात, शेअर केले फोटो  title=

मुंबई : अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिने शेअर केलेले खास फोटो. या फोटोतून सईने तिच्या आयुष्यातील खास गोष्ट सेअर केली आहे. सईने आपण प्रेमात असल्याची भावना व्यक्त केली आहे. 

सईने आपलं लग्न ठरल्याची माहिती इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. एवढंच नव्हे तर हळदीचे फोटो देखील शेअर केलेत. 'लग्नगाठ ही स्वर्गातच बांधली जाते....' अशी एक पोस्ट शेअर करत आपल्याला आपला जोडीदार मिळाल्याची कबुली दिली आहे. #inlove हॅशटॅग वापरत सईने फोटो शेअर केलाय खरा पण यामध्ये आपल्या जोडीदारासोबतचा पाठमोरा फोटो शेअर केलाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I have every reason to believe that matches are made in heaven. And I finally found mine... #inlove

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

या फोटोनंतर सई पुन्हा एकदा सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे. ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे, ती व्यक्ती नेमकी कोण आहे? तिचा हा जोडीदार सिनेसृष्टीतला आहे की अजून कुणी?, असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mujhe apni preet vich rang de 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

सईच्या हातावर मेहंदी सुद्धा लावली आहे. सईने तीन फोटो शेअर केलेत.२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

And here he comes. #mydimpledguy

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on