Raj Dirty Picture : राज कुंद्राने जमावला लाखोंचा गल्ला, बँक डिटेल्स आले समोर

या उद्योगातून राज कुंद्रा किती रुपयांची कमाई करत होता, याचा अंदाज बांधणही कठीण आहे.

Updated: Jul 21, 2021, 08:02 PM IST
 Raj Dirty Picture : राज कुंद्राने जमावला लाखोंचा गल्ला, बँक डिटेल्स आले समोर  title=

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राची 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आता राज कुंद्रा यांच्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे होत आहेत. एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. 

त्यातच आता त्याच्या खात्यात रोज लाखो रुपयांचं डिपॉझिट होत असल्याचं समोर आलं आहे. राज कुंद्राचे काही बँक डिटेल्स हाती लागले आहेत. त्यात Hotshots डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट टाकून राज कुंद्राच्या खात्यात रोज किती रुपये जमा होत होते याची हैराण करणारी आकडेवारी समोर आली आहे. 

हाती लागलेल्या एक्सक्लुझिव्ह बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्याची कंपनी दिवसाला 1 ते 10 लाख रुपये इतकी कमाई करत होती. राज कुंद्राच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचं बँक डिटेल्सवरुन दिसून आलं आहे. ही रोजची आकडे लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे या उद्योगातून राज कुंद्रा किती रुपयांची कमाई करत होता, याचा अंदाज बांधणही कठीण आहे.

राज कुंद्राचे बँक डिटेल्स

22 डिसेंबर 2020 – 3 लाख रुपये
25 डिसेंबर 2020 – 1 लाख रुपये
26 डिसेंबर 2020 – 10 लाख रुपये
28 डिसेंबर 2020 – 50 हजार रुपये
3 जानेवारी 2021 – 2 लाख 5 हजार रुपये
10 जानेवारी 2021 – 3 लाख रुपये
13 जानेवारी 2021 – 2 लाख रुपये
20 जानेवारी 2021 – 1 लाख रुपये
23 जानेवारी 2021 – 95 हजार रुपये
3 फेब्रुवारी 2021 – 2 लाख 70 हजार रुपये