Akshay Kumar : अक्षय कुमार हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. त्याचा सोशल मीडियावर एक फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो अगदी जुना आहे आणि त्यातूनही यात अक्षय कुमार हा प्रचंड हॅण्डसम आणि चार्मिंग दिसतो आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. परंतु सध्या या फोटोसोबत त्यानं लिहिलं कॅप्शन हे फारच जास्त इंटरेस्टिंग आहे. आपल्यला आपल्या आयुष्यातलं पहिलं प्रेम कधी मिळेल याची आपल्याला काहीच कल्पना नाही. ते कधीही मिळू शकते. अक्षय कुमारच्या बाबतीतही काहीसं असंच झालं आहे. अक्षय कुमारच्या अफेअर्सबद्दल अनेकदा चर्चा रंगलेली होती. सध्या त्याची आणि ट्विंकल खन्नाची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. त्यांच्या लग्नालाही अनेक वर्षे झाले आहेत. अक्षय कुमारला आपल्या वयाच्या 23 व्या वर्षी पहिलं प्रेम मिळालं होतं, याबद्दलचा खुद्द त्यानंच खुलासा केला आहे.
त्याच्या फोटोखालचं कॅप्शन हे असंच बोलकं आहे. त्यामुळे त्याच्या या कॅप्शनची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल खुलासा केला आहे. त्यानं यावेळी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या सर्वच गोष्टी कायमच खास असतात. त्याचप्रमाणे माझ्यासाठी हा फोटोही खूप खास आहे. हा फोटो काढला त्यावेळी मी 23 वर्षांचा होतो आणि कॅमेऱ्यासमोर फोटो काढण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे मला हे कळण्याआधीच कॅमेरा हे माझे पहिले प्रेम झाले होते. प्रेमासाठी शुभेच्छा'' असं कॅप्शन त्यानं लिहिलं आहे. यावेळी त्यानं पुढे लिहिलंय की #throwbackthursday
सध्या त्याच्या या फोटोखाली नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यातून त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्याच्या या फोटोवमधील कॅप्शनवरून हे लक्षात येते की कॅमेरा हे त्याचं पहिलं प्रेम होते. कोणी मुलगी नाही. त्याच्या या फोटोवर एका युझरनं कमेंट केली आहे की, 'नेपोटिझन नाही तर प्युअर टॅलेंट'. 'हा तर आधीही फार हॅण्डसम होता आताही हा फारच हॅण्डसम दिसतो आहे.'
सध्या त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. अक्षय कुमारचा यावर्षी 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फारच गाजला होता.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.