अक्षय कुमारच्या मुलाने भर रस्त्यात असं का केलं? की त्याची थेट मुलींसोबत होतेय तुलना

आरवला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Updated: Mar 5, 2022, 04:01 PM IST
  अक्षय कुमारच्या मुलाने भर रस्त्यात असं का केलं? की त्याची थेट मुलींसोबत होतेय तुलना  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना तिचा मुलगा आरव कुमार आणि मुलगी नितारा कुमार सोबतचे खास फोटो नेहमीच शेअर करताना दिसते.ती एक उत्तम गृहिणी आणि एक सुपर मॉम आहे.जिला तिचे काम आणि कौटुंबिक जीवन कसे सुरळीत रित्या चालवावे याची माहिती आहे.

अलीकडेच ट्विंकल तिचा मुलगा आरवसोबत मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसली. पण यावेळी तिच्या मुलगाने हिरव्या रंगाची बॅग कॅरी केली होती.

यावेळचा हा फोटो समोर येताच ही बॅग काहीशी मुलींच्या बॅगप्रमाणे असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे नेटकरी त्याची तुलना मुलींसोबत करत आहेत. आणि त्याला ट्रोल करत आहेत. 

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांची मुलं आरव कुमार आणि नितारा हे सोशल मीडियावर सक्रिय नसतात.. दोन्ही मुलं क्वचितच प्रसिद्धीच्या झोतात राहतात. आरवा हा सध्या आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोलत आहेत.

आरव कुमार सध्या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर नितारा मुंबईतच शिकत आहे. ट्विंकल आणि अक्षय त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांच्या मुलांचे फोटो शेअर करतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता समोर आलेल्य़ा फोटोत मुंबईच्या रस्त्यांवर  ट्विंकल आणि आरव शॉपिंग करताना दिसत आहेत. दोघांना यावेळी फोटोग्राफर्सने स्पॉट केले. एका पापाराझी पेजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ट्विंकलच्या मागे आरव तिचा पाठलाग करताना आणि शॉपिंग बॅग घेऊन जाताना दिसत आहे.

पण यावेळी आरव त्याच्या खांद्यावर असलेल्या बॅगमुळे ट्रोल झाला. काही सोशल मीडिया यूजर्सना त्याचा लूक आवडला नाही म्हणून त्यांनी आरवला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.