मुंबई : मासिकपाळीच्या काळात स्त्रियांनी पुरेशी स्वच्छता न पाळल्यास त्यांच्या आरोग्यावर अनेक गंभीर होतात. आपल्या समाजामध्ये मासिकपाळी या विषयावर फार खुलेपणाने बोलले जात नाही. सोबतच अनेक समज गैरसमज असल्याने स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत अनेक समस्या वाढण्यामागे हे कारण ठरत आहे.
नुकतीच सॅनिटरी पॅडची जीएसटीमधून सुटका करण्यात आली आहे. यामुळे पूर्वी पॅड्सवर असणारा 12 % टॅक्स आता शुन्य करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे सार्यांनीच स्वागत केले आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही याबाबत खास ट्विट करून सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
सॅनिटरी पॅडची जीएसटीच्या कक्षेतून सुटका झाल्यानंतर, 'हा निर्णय ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अनेक महिला मूक राहून या निर्णयाचं स्वागत करत असतील अशी पोस्ट लिहताना सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत आभार मानले आहेत. '
One of those days when a news brings tears of joy as a cause close to ur heart gets fulfilled.Thank you, #GSTCouncil,for understanding the need for menstrual hygiene & exempting sanitary pads from tax. I'm sure crores of women in our country are silently sending gratitude ur way
— Akshay Kumar (@akshaykumar) July 21, 2018
पॅडमॅन अरूणाचलम मुरूगानाथम या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित अक्षयने नुकताच 'पॅडमॅन' हा सिनेमा केला होता. या चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने केली होती. जगभरात या चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे.