नवी दिल्ली : अक्षय कुमार हा सध्या बॉलिवूडचा हिट हिरो आहे. प्रत्येक वर्षाला त्याचे २-३ चित्रपट प्रदर्शित होतात. आता त्याच्या नेम, फेम, पैसा असला तरी करिअरच्या सुरूवातीला मात्र त्याच्याशी कोणी फारसे चांगले वागत नसे.
त्याला बाहेरून आलेला म्हणून काहीशी वेगळी वागणूक मिळत असे. त्याला मिळणाऱ्या सुविधा या तो किती हिट किंवा फ्लॉप चित्रपट देतो, त्यावर अवलंबून होत्या. अक्षयने आपल्या आगामी चित्रपट केसरीचे शुटींग करायला सुरूवात केली आहे. हा चित्रपट सारागडीच्या प्रसिद्ध युद्धावर आधारित आहे.
एका मुलाखतीत तो म्हणाला की, मला बाहेरून आलेला म्हणून वेगळी वागणूक दिली जात होती. माझे ३-४ चित्रपट चालले नव्हते. आणि इतर कलाकाराचे चित्रपट चालले असल्यास आम्ही समान महत्त्व असलेल्या भूमिका करत असताना देखील मला वेगळी वागणूक दिली जात होती. त्या कलाकाराला उत्तम, प्रशस्त रूम तर मला फक्त एक खोली दिली गेली होती. त्याला शानदार कार तर मला बसने येण्यास सांगितले जायचे. हा खरंच असे होत असे. आणि मात्र माझे काही चित्रपट चालू लागल्यावर चित्रपटसृष्टीतील लोकांशी माझे संबंध हळूहळू बदलू लागले.
मात्र त्या दिवसातही मी कधी हार मानली नाही. दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्षय खूप व्यस्त आहे. २६ जानेवारीला त्याचा पॅडमॅन हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचा रजनीकांतसोबतचा '2 पॉइंट 0' हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल. डिसेंबरमध्ये अक्षयने त्याच्या गोल्ड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच तो कुटुंबासोबत केपटाऊनला सुट्ट्यांसाठी गेला होता. आणि आता त्याने करण जोहरच्या केसरी चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरूवात केली आहे.