Akshay Kumar बॉलिवूड सोडून राजकारणात होणार सक्रिय? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

'अभिनेत्याच्या रुपात मी आता...', अक्षय कुमार करणार राजकारणात एन्ट्री?   

Updated: Jul 5, 2022, 11:21 AM IST
Akshay Kumar बॉलिवूड सोडून राजकारणात होणार सक्रिय? अभिनेत्याकडून मोठा खुलासा title=

मुंबई : आतापर्यंत अनेक कलाकारांनी बॉलिवूडला राम राम ठोकत राजकारणात प्रवेश केला आहे. यांपैकी अनेक कलाकार राजकारणात मोठ्या पदावर देखील आहेत. त्यामुळे आता कायम सामाजिक भान राखणारा अभिनेता अक्षय कुमार राजकारणात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगत आहे. अक्षय बॉलिवूड सोडून राजकारणात सक्रिय होणार का? या प्रश्नाचं उत्तर खुद्द अभित्याने दिल आहे. एका कार्यक्रमात अक्षयने स्वतःच्या राजकीय एन्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

पीटीआयनुसार, एका कार्यक्रमात राजकारणात सामील होण्याबद्दल अक्षयला विचारले असता, अक्षय म्हणाला,  'मी बॉलिवूडमध्ये खूप आनंदी आहे... एक अभिनेता म्हणून मी सामाजिक प्रश्न मांडण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो.' अक्षयच्या या वक्तव्यानंतर अभिनेता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचं कळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षय पुढे म्हणाला, 'मी 150 सिनेमांमध्ये काम केलं, 'रक्षाबंधन' माझ्या अत्यंत खास सिनेमा आहे. मी सामाजिक सिनेमांसोबत व्यावसायिक  सिनेमे करण्याला प्राधान्य देतो. मी वर्षातून तीन-चार सिनेमे निर्मित करतो.' सध्या राजकारणाबाबत अक्षयचं वक्तव्य चर्चेत आहे. 

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा... 
'सुर्यवंशी' सिनेमाच्या यशानंतर अक्षय 'रक्षाबंधन' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत यांच्याही मुख्य भूमिका आहेत.