पाठकबाईंचं दमदार कमबॅक! छोट्या पडद्यावरुन आता थेट चित्रपटातून येणार चाहत्यांच्या भेटीला

Akshaya Deodhar : सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अक्षया देवधरची. यावेळी तिच्या नव्या चित्रपटाची चर्चा आहे. तिच्या नव्या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तिचा हा नवा चित्रपट 8 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 3, 2023, 07:42 PM IST
पाठकबाईंचं दमदार कमबॅक! छोट्या पडद्यावरुन आता थेट चित्रपटातून येणार चाहत्यांच्या भेटीला title=
akshaya deodhar new upcoming new film poster goes viral on instagram

Akshaya Deodhar : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षया देवधर हिची. 'तुझ्यात जीव रंगला' ही तिची मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची जोडीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता ते दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगते आहे. इन्स्टाग्रामवर ते आपले एकत्र फोटो हे शेअर करताना दिसतात. मध्यंतरी ते दोघं जेजूरीलाही एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांचे फोटो, व्हिडीओ हे सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाले होते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर बरेच दिवस अक्षया देवधर ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीपासून दूर होती. आता अक्षया देवधरची पुन्हा एन्ट्री होणार आहे. नव्या कोऱ्या चित्रपटातून ती महत्त्वाच्या भुमिकेतून दिसणार आहेत. 

सध्या या चित्रपटाचा पोस्टर हा व्हायरल झाला आहे. यावेळी अक्षया देवधरसह सायली संजीव, डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, पार्थ भालेराव अशी स्टारकास्ट दिसते आहे. पिल्लू बॅचलर असं या चित्रपटाचं नावं आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. यातून अभिनेत्री अक्षया देवधर ही मराठी चित्रपटसृष्टीतून पदार्पण करते आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही आहे. नावावरून हा चित्रपट फारसं वेगळा वाटतो आहे. त्याचसोबत या चित्रपटाची सध्या चर्चाही आहे. त्यामुळे या चित्रपटाची नक्की कथा काय असेल यावरून प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढली आहे. यावेळी त्यामुळे अक्षयाच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली होती. 

श्री गणेश मार्केटिंग अॅन्ड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी हा चित्रपट लिहिला आहे. दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केले आहे. यापुर्वी तानाजी घाडगे यांनी यापुर्वी 'बस्ता' आणि 'बरड' असे उत्तम चित्रपट केले आहे.  या चित्रपटाचे गीत हे मंगेश कांगणे यांनी केले आहे. तर चिनार महेश यांनी याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तसेच सुर्या मिश्रा यांनी याचे छायांकन केले असून अनंत कामथ यांनी संकलन केले आहे. वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 8 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर हार्दिक आणि अक्षयाची जोरात चर्चा होती. त्यातून त्यांचे रील्सही चर्चेत असतात. लग्नानंतरच्या त्यांच्या पहिल्या सणांचीही बरीच चर्चा होती.