मुंबई : संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावती' या बहुप्रतिक्षीत सिनेमाबाबत लोकांमध्ये खूपच उत्सुकता आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर 'पद्मावती' हे मुख्य पात्र साकारणार्या दीपिका पादूकोनचा लूक दाखवण्यात आला. त्यानंतर रावल रतन सिंहच्या भूमिकेतील शाहीद कपूर आणि अल्लाउद्दीन खल्जी साकारणारा रणवीर सिंगचा लूकही रसिकांसमोर आला.
राकट आणि डोळ्यात सूडाग्नी असलेला रणवीरचा पोस्टर कालच रिलीज झाला. त्यापाठोपाठ आज 'पद्मावती'मध्ये जलालुद्दीनची भूमिका साकारणार्या रझा मुराद यांनी देखील एक खास पोस्ट लिहीत त्यांचा लूक रसिकांसमोर आणला.
इतर कलाकारांच्या भूमिकेबद्दलही रसिकांमध्ये फारशी माहिती देण्यात आली नव्हती. पण रझा मुराद यांनी खास फोटो शेअर करताना नकळतच थोडी जास्त माहिती पोस्टमध्ये लिहल्याने अल्पावधीत तो फोटो डिलिट केला असावा असा तर्क लावण्यात येत आहे.
पद्मावती हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.