अन् अनुपम खेरही झाले धोनीच्या मुलीचे फॅन

अभिनेते अनुपम खेर सध्या 'रांची डायरीज' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रांचीमध्ये आहेत.

Updated: Oct 4, 2017, 08:38 AM IST
अन् अनुपम खेरही झाले धोनीच्या मुलीचे फॅन  title=

मुंबई : अभिनेते अनुपम खेर सध्या 'रांची डायरीज' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रांचीमध्ये आहेत.

चित्रपटाच्या प्रमोशनमधून थोडा वेळ काढून अनुपम खेरनी धोनीच्या नव्या घराला भेट दिली. या भेटीदरम्यानचे काही क्षण त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांसोबतही शेअर केले आहेत. 

साक्षी आणि महेंद्रसिंग धोनीच्या आदरतिथ्याचे कौतुक करत त्यांनी धोनीच्या कुटुंबियांचे आभार मानले आहेत. तसेच महेंद्रसिंगच्या मुलीचेही कौतुक केले आहे. 

धोनीची मुलगी हुशार आणि मनोरंजक आहे. भारताच्या राष्ट्रगीताप्रमाणेच झिवा कोणतेही गाणं अगदी खणखणीत आवाजात गाऊ शकते. देव तिचे भले करो ! असा शुभार्शिवाद त्यांनी दिला आहे. 

' एम.एस.धोनी : द अ‍नटोल्ड स्टोरी' या धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी धोनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.  
'रांची डायरीज' या चित्रपटाचे दिग्दर्शन सात्विक मोहंती यांनी केले आहे. अनुपम खेर निर्मित या चित्रपटात जिम्मी शेरगिल, हैरी बाला आणि प्रदीप सिंह आहेत. ५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.