अभिनेता अली असगरच्या कारला अपघात, मुंबई पोलिसांचे मानले आभार

कॉमेडि‍यन अली असगरच्या गाडीला अपघात.

Updated: Mar 12, 2019, 12:24 PM IST
अभिनेता अली असगरच्या कारला अपघात, मुंबई पोलिसांचे मानले आभार title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये काम करणारा अभि‍नेता आणि कॉमेडि‍यन अली असगरच्या गाडीला अपघात झाला. त्याची कार एका ट्रकला ठोकली. या अपघातात त्याला कोणतीही गंभीर दुखापत नाही झाली. मुंबईत त्याच्या कारला अपघात झाला. तो स्वतः कार चालवत होता. एका सिग्नलवर त्याची गाडी थांबलेली असताना दुसऱ्या गाडीने मागून त्याच्या गाडीला ठोकर दिली. त्यानंतर त्याचा गाडी पुढे उभ्या असलेल्या एका गाडीला जावून ठोकली. या घटनेत त्याच्या गाडीचं नुकसान झालं आहे. पण तो सुखरुप आहे. ट्विटरवर त्याने ही माहिती दिली. या ट्विटमध्ये त्याने मुंबई पोलिसांचे आभार देखील मानले.

अलीने ट्विट केलं की, देवाचे आभार. या घटनेत तो बचावला. त्यांने मुंबई पोलिसांचे आणि पीएसआय लिलाधर पाटील यांचे आभार मानले आहेत.

अली असगर सध्या प्रसिद्ध अभिनेता आहे. कपिल शर्माच्या शोमधून त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.