सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या आलियाची Anupam Kher यांना भुरळ; म्हणाले....

Sidharth Malhotra आणि Kiara Advani च्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आलियानं हजेरी लावली होती. त्यावेळी तिला तेथे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले इतकेच काय तर अनुपम यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Feb 14, 2023, 01:17 PM IST
सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या आलियाची Anupam Kher यांना भुरळ; म्हणाले.... title=

Alia Bhatt and Anupam Kher : बॉलिवूड अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे दोघं नुकतेच लग्न बंधनात अडकले. त्यांनी रविवारी 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत ग्रँड वेडिंग रिसेप्शन दिली. यावेळी त्यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधले ते म्हणजे सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री आलिया भट्टनं. आलिया भट्टनं सिद्धार्थच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावल्यानं सगळ्यांना धक्का बसला. दरम्यान, तिचे रिसेप्शनमधले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर अभिनेता अनुपम खैर यांनी आलियासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आलियासोबत फोटो शेअर केला आहे. त्या दोघांचा हा फोटो सिद्धार्थ आणि कियाराच्या वेडिंग रिसेप्शनमधील आहे. हे फोटो शेअर करत अनुपम म्हणाले की, "प्रिय आलिया भट्ट! सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये इतक्या दिवसांनी तुला भेटून खूप छान वाटलं. तू शाळेत होती तेव्हाच्या दिवसांबद्दल बोलून खूप छान वाटलं. त्यामुळे मी तुला जन्मच अभिनेत्री होण्यासाठी झाल्याचे म्हणत चिडवायचो. तुझे अनेक पर्फॉर्मंस मला आवडले...विशेषत: गंगूबाई काठियावाडीत तू अप्रतिम अभिनय केलास. खूप प्रेम!'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनुपम यांच्या कामा बद्दल बोलायचे झाले तर ते सुपर हीट ठरलेल्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेन प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली. नुकताच त्यांचा शिव शास्त्री बाल्बोआ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नसला तरी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. दरम्यान, याशिवाय अनुपम हे कार्तिकेय 2 मध्ये दिसणार आहेत. 

कियारा आणि सिद्धार्थ हे राजस्थान जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले.

हेही वाचा : पूजा, 'पठाण'च्या 'नॉटी टॉक'नं नेटकऱ्यांना लावलं वेड; Shah Rukh Khan नं फोन करून विचारलं 'कधी येणार तू?'

या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.