हॉटेलमधून बाहेर पडताना रणबीरने आलियासोबत जे केलं, पाहणारे पाहतच राहिले

 चाहते या दोघांना परफेक्ट कपल म्हणून ओळखतात.

Updated: Mar 10, 2022, 01:06 PM IST
 हॉटेलमधून बाहेर पडताना रणबीरने आलियासोबत जे केलं, पाहणारे पाहतच राहिले title=

मुंबई : बॉलीवूडच्या हॉट कपल्सच्या यादीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे नाव सर्वात जास्त चर्चेत असते. या दोघांना एकत्र पाहायला चाहत्यांना फार आवडते.

अलीकडेच हे दोघेही डेटवर गेले होते, त्या दरम्यान आलिया भट्ट कॅमेऱ्यासमोर येताच लाजली. आलिया भट्टचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

'गंगुबाई काठियावाडी' सिनेमा रिलीज झाल्यापासून आलिया भट्ट सतत चर्चेत आहे. आलिया भट्टचा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे.

आलिया भट्टने आता तिच्या चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे.नुकतीच आलिया भट्ट स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी डिनर डेटसाठी एका हॉटेलमध्ये पोहोचली.

यावेळी आलिया भट्टसोबत रणबीर कपूर देखील होता. दोघांनी डिनर डेट एन्जॉय केली आणि त्यानंतर तेथून बाहेर पडताना त्यांना स्पॉट करण्यात आलं.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते या दोघांना परफेक्ट कपल म्हणून ओळखतात.

या व्हिडिओत रणबीर कपूर गर्दीपासून आलियाचा बचाव करताना दिसत आहे. त्यांना बाहेर येताच आलियाचा हात धरला आहे. बॉलिवूड कपलची ही केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडियाला पाहून आलिया भट्ट लाजताना दिसली. रात्री उशिरा हॉटेलमधून आलिया- रणबीर बाहेर पडले त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे