नाचता येईना... लग्नानंतर पहिल्यांदाच Kitchen मध्ये आलिया, पॅनमध्ये तेल टाकलं आणि....

लग्नानंतर व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया बनवतेय 'ही' भाजी... पाहा व्हिडीओ  

Updated: Apr 25, 2022, 11:48 AM IST
नाचता येईना... लग्नानंतर पहिल्यांदाच Kitchen मध्ये आलिया, पॅनमध्ये तेल टाकलं आणि....  title=

मुंबई : बॉलिवूडची क्यूट गर्ल म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं नुकताचं लग्न झालं. लग्नाआधी अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती, पण आता लग्नानंतर आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसत आहे. आलियाचा हा व्हिडीओ जुना आहे, पण तो लग्नानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. 

व्हिडीओमध्ये आलिया स्वयंपाक घरात जेवन बनवताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे शेफ देखील आहे. त्यांनी आलिया भाजी बनवायला शिकवली. आलियाच्या शेफ यांनी तिला भाजी चिरण्यापासून फोडणी देण्यापर्यंत सर्व शिकवताना दिसत आहे. 

पण पॅनमध्ये तेलात तडतडणारी राई पाहून घाबरून गेली होती.  शेफ दिलीप कायम आलियाच्या हेल्थची काळजी घेतात. व्हिडीओमध्ये आलिया म्हणते, 'शेफ दिलीप आऊटडोर शूटिंगसाठी देखील माझ्या सोबत असतात...' हा व्हिडीओ युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सध्या आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्या आलिया हेल्दी जुकिनीची भाजी बनवताना दिसत आहे. आलिया ज्याप्रमाणे किचनमध्ये भाजी बनवत आहे, ते पाहून प्रत्येकाला वाटत असेल अभिनेत्रीने पहिल्यांदाचं किचनमध्ये पाय ठेवला असेल.