आलियाच्या जाऊबाईचा सोशल मीडियावर धुमाकूळ; मोकोनी मधील फोटो व्हायरल

बॉलिवूडमध्ये सध्या रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत

Updated: Apr 5, 2022, 08:04 PM IST
आलियाच्या जाऊबाईचा सोशल मीडियावर धुमाकूळ; मोकोनी मधील फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. पण या दरम्यान, आलियाची जाऊबाई हेडलाइन्समध्ये आहे. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री तारा सुतारियाबद्दल, जी सध्या मालदीवमध्ये आहे. आणि तिथून तिचे सुंदर फोटो शेअर करत आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर लाईक्स-कमेंटचा वर्षाव केला आहे.

मालदीवमध्ये पोहोचली तारा सुतारिया
अभिनेत्री तारा सुतारियाने तिच्या मालदीव व्हेकेशनचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हिरवाईच्या वातावरणात उभी राहून पोज देताना दिसत आहे. फोटोत, अभिनेत्रीने एनिमल प्रिंटमध्ये वन-पीस स्विमसूट घातला आहे आणि त्यावर तिने पांढरा केप घेतला आहे. ज्यामुळे तिचा लूक आणखी आकर्षक दिसत आहे. तारा सुतारियाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिचा बॉयफ्रेंड आधार जैनने या फोटोवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया आणि ताराचं नातं
तारा सुतारियाने काही दिवसांपूर्वी आपल्या नात्याची घोषणा केली होती. तिने आधार जैनसोबत तिचं नातं अधिकृतपणे घोषित केलं. आधार जैन हा रीमा जैन यांचा मुलगा आहे. नात्याने रीमा ही जैन कपूर घराण्याची मुलगी आणि रणबीर कपूर आणि करीना कपूर आत्या आहे. या नात्यामुळे आलियाने रणबीरशी लग्न केलं आणि आदरने तारासोबत लग्न केलं तर दोघेही जाऊबाई बनतील.