प्रसिद्धी मिळताचं आलिया 'बेवफा', Boyfriends ना अर्ध्यावरचं सोडलं

रणबीरशी लग्न करण्यासाठी उतावळी असणारी आलिया आधी कोणा-कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होती माहितीये का?   

Updated: Mar 15, 2022, 11:33 AM IST
प्रसिद्धी मिळताचं आलिया 'बेवफा', Boyfriends ना अर्ध्यावरचं सोडलं  title=

मुंबई : इंडस्ट्रींमध्ये कायम सेलिब्रिटींच्या नात्याबद्दल चर्चा रंगत असतात. त्यामुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे, किंवा त्यांच्या आयुष्यातील सेलिब्रिटींच्या आयुष्यात कोण खास आहे? अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या चर्चा रंगत आहे आलिया भट्टच्या अफेअर लिस्टची. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेता रणबीर कपूर आधी आलियाच्या आयुष्यात दोन खास व्यक्ती होत्या. 

रमेश दुबे
रमेश दुबे हा आलियाचा पहिला बॉयफ्रेंड होता. आलिया आणि रमेश एकत्र शाळेत शिक्षण घेत होते. रमेश कॅमेऱ्यापासून दूर असतो पण सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण रमेश आणि आलियाचं नातं फार काळ टिकलं नाही. 

अली दादरकर 
अली दादरकर हा आलियाचा दुसरा बॉयफ्रेंड आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आलिया आणि अली एकमेकांना डेट करत होते. दोघे एका घट्ट नात्यात असल्याचं समोर आलं, पण आलिया अभिनेत्री झाल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. एवढंच नाही तर त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. 

अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा 
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया रिलेशनशिपमध्ये होते, हे प्रत्येकाला माहिती होतं. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण त्यांनी कधी त्यांच्या नात्याचा स्वीकार चाहत्यांसमोर केला नाही. आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. 

अभिनेता रणबीर कपूर
आलिया आणि रणबीर यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघे लवकरचं लग्न करणार असल्याचं देखील समजत आहे. एवढंच नाही दोघांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार देखील केला. आता चाहत्यांना दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.