close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आलिया भट्ट कपूर कुटुंबासाठी सून म्हणून योग्य

रणबीर-आलियाने घेतली ऋषी कपूरची भेट...

Updated: Jun 24, 2019, 10:08 PM IST
आलिया भट्ट कपूर कुटुंबासाठी सून म्हणून योग्य

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी नुकतीच न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूर यांची भेट घेतली. ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांची भेट घेतली होती. यानंतर आता रणबीर-आलियाने त्यांची भेट घेतली. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी योगायोगाने ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन आणि इतर कपूर कुटुंबीयही त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी आलिया कपूर कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणेच वावरत होती. बच्चन आणि कपूर कुटुंबीयांच्या भेटीचे हे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्येही आलिया भट्ट कपूर कुटुंबात चांगल्याप्रकारे रुळल्याचे दिसत आहे. त्यामुळे रणबीर आणि आलिया लवकरच लग्नगाठ बांधतील, अशी अटकळ बांधली जात आहे. 

 

 

रणबीर आणि आलिया गेल्या काही दिवसांपासून 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र होते. या शुटिंगमधून ब्रेक घेऊन दोघेही बऱ्याच दिवसांनी कपूर कुटुंबाबरोबर मजा करताना दिसले. यावेळी लंडनमध्ये ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर-साहनी, नात समारा साहनी आणि पत्नी नीतू कपूर तिथे उपस्थित होत्या. अभिषेक- ऐश्वर्याच्या उपस्थितीने या क्षणाची रंगत आणखीनच वाढली. 

अभिषेक-ऐश्वर्या बच्चन गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्येच आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिच्यासोबत ते डिनरलाही गेले होते. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ऐश्वर्या राय लवकरच मणीरत्नम यांच्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करत आहे.