'बाहुबली' अभिनेत्रीकडून रेकॉर्डब्रेक दराने फ्लॅटची खरेदी

प्रति स्क्वेअर फूटचा भाव ऐकला तर तुम्हाला धक्काच बसेल...

Updated: Jun 24, 2019, 09:00 PM IST
'बाहुबली' अभिनेत्रीकडून रेकॉर्डब्रेक दराने फ्लॅटची खरेदी

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटियाने मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटच्या चारही बाजूंनी सी व्ह्यू आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी तमन्नाने बाजार भावहून अधिक पैसे मोजले आहेत.

बाहुबली फेम अभिनेत्री तमन्नाने मुंबईतील वर्सोवा भागात नवं घर घेतलं आहे. या स्वप्ननगरीत घरं घेणं अनेकांसाठी स्वप्न आहे. तर दुसरीकडे तमन्नाने दुप्पट पैसे देऊन हा सी व्ह्यू फ्लॅट घेतला आहे. तमन्नाने ज्या भागात फ्लॅट घेतला आहे, त्यापासून ५०० मीटरवर ३० हजार ते ४० हजार स्क्वेअर फूट भाव आहे. परंतु तमन्नाने या भागात स्क्वेअर फूटसाठी ८० हजार ७७८ रुपये इतकी किंमत मोजली आहे. 

या घरासाठी तमन्नाने आतापर्यंत १६.६० करोड रुपये भरले आहेत. त्याशिवाय ९९.६० लाख स्टॅम्प ड्यूटीही भरली आहे. 

हा फ्लॅट वर्सोवा जुहू लिंक रोड या भागात आहे. बिल्डर समीर भोजवानीकडून तिने हा फ्लॅट खरेदी केला आहे. घरातून चारही बाजूने समुद्र आहे. Bayview या इमारतीच्या २२ मजल्याच्या इमारतीतील १४व्या मजल्यावर तमन्नाचा फ्लॅट आहे.