Richa Chadha's mother got alarmed after heard about Ali Fazal : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि तिचा पती अली फजल हे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकले. त्या दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री ही प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चेत राहिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांचं रिलेशनशिप चर्चेत येण्याचं कारण त्या दोघांचा धर्म आहे. ते दोघेही वेगवेगळ्या धर्मातील आहेत. त्यामुळे त्यांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्न करावे लागले. दरम्यान, रिचानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आईची त्या दोघांच्या नात्यावर कशी प्रतिक्रिया होती याचा खुलासा केला आहे.
रिचानं ही मुलाखत ऑल अबाउट इव्ह पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रिचानं तिच्या आणि अली फजलच्या रिलेशनशिपविषयी जेव्हा आईला सांगितले तेव्हा त्यावर आईची प्रतिक्रिया कशी होती. रिचाच्या आईला अली फजल हा पाकिस्तानी गायक आहे असं वाटलं होतं, कारण त्यांनी इंटरनेटवर सर्च केल्यावर त्याच्याविषयी अनेक गोष्टी वाचल्या होत्या. इतकंच नाही तर त्याचं आधीच लग्न झालं असून त्याला दोन मुलं देखील आहेत असं रिचाच्या आईला वाटले होते.
याविषयी सविस्तर सांगताना रिचा म्हणाली की "जेव्हा मी माझ्या आईला सांगितले की मी या माणसाला डेट करते, तेव्हा तिने मला खूप टेन्शनमध्ये येऊन कॉल केला. ती म्हणाली, 'मला हे माहिती नाही कि हे तुला हे माहिती आहे की नाही, तो मुलगा विवाहीत आहे आणि त्याला दोन मुलं आहेत.' मी म्हणाले, 'काय?' तर आई म्हणाली, 'हो, तो लाहोरचा आहे, तो विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत'. त्यावर उत्तर देत मी म्हणाले की 'तो हा मुलगा नाही.'"
आईची समजूत कशी काढली याविषयी सांगत रिचा पुढे म्हणाली की 'अली फजल आणि अली जफर हे दोन वेगळे लोक आहेत.' अली फजलला पहिल्यांदा पाहिल्यावर रिचाच्या आईनं कशी प्रतिक्रिया दिली याविषयी सांगत ती म्हणाली की जेव्हा आई पहिल्यांदा अलीला भेटली तेव्हा तो तिला प्रचंड आवडला होता.
हेही वाचा : Leo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे
रिचाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच 'फुकरे 3' मध्ये दिसली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात अली फजलशिवाय संपूर्ण जूनी कास्ट होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंह लांबा यांनी केले आहे. तर या चित्रपटाच्या पटकथेचे लिखान हे विपुल विग आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. एक्सेल एंटरटेनमेंटनं चित्रपटाची निर्मिती केली आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.