मुंबई : बॉलिवूड कलाकारही लोकसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी उत्साही आहेत. २९ एप्रिल रोजी मुंबईत चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'कलंक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत आलियाने तिला मतदान करण्याची ईच्छा आहे परंतु आलियाकडे भारतीय पासपोर्ट नसल्याने ती मतदान करू शकत नसल्याचं तिने म्हटलंय. आलियाची आई सोनी राजदान यांच्याकडे ब्रिटिश नागरिकता आहे आणि आलियाकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.
आलिया 'कलंक'ची टीम वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हासह एका टिव्ही मुलाखतीसाठी गेली होती. त्यावेळी या सर्व कलाकारांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जाणार का असा सवाल करण्यात आला. त्यावेळी वरुण, सोनाक्षी आणि आदित्य रॉय कपूर यांनी मतदान करणार असल्याचे सांगत हे गरजेचे असल्याचेही सांगितले. तेव्हा आलियाने माझ्याकडे भारताचा पासपोर्ट, भारताचे नागरिकत्व नसल्याने मी मतदान करू शकत नसल्याचे सांगितले.
आलिया तिच्याकडे भारताचे नागरिकत्व असल्याशिवाय मतदान करू शकत नाही. आलिया सोनी राजदान आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे. आलियाचा आगामी बहुचर्चित 'कलंक' चित्रपट १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आलियासह सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, माधुरी दिक्षित, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट 'कलंक'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टरमधून प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे आता 'कलंक' बॉक्सऑफिसवर काय कमाल करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.