प्रेग्नेंट Alia Bhatt तिच्या पहिल्या Kiss बद्दल सांगते...

अभिनेत्रीच्या पहिल्या किसवर बसणार नाही तुमचा विश्वास, अभिनेत्री सांगते...  

Updated: Jul 13, 2022, 11:21 AM IST
प्रेग्नेंट Alia Bhatt तिच्या पहिल्या Kiss बद्दल सांगते...  title=

मुंबई :  'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमात शनाया म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यानंतर आलियाने अभिनेता रणबीर कपूरसोबत 14 एप्रिल रोजी लग्न केलं. एवढंच नाही, तर आलिया लवकरचं पहिल्या बाळाला जन्म देखील देणार आहे. खुद्द आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. 

आलियाने वयाच्या 25 व्या वर्षांचं मुलांबद्दल विचार केला होता. 2018 मध्ये आलियाने 'फिल्मफेयर'ला दिलेल्या मुलाखतीत लग्नानंतरच्या जीवनाबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आलिया सांगितल्यानुसार तिला दोन मुलं हवी आहेत. 

एवढंच नाही तर अभिनेत्री मुलांची नाव ठरवण्यात देखील तेव्हापासून सुरुवात केली होती. यावेळी आलियाने तिच्या पहिल्या किसबद्दल देखील सांगितलं. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आलियाने पहिलं किस केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नाआधी आलिया अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण लहानपणापासून रणबीर तिचा क्रश होता. कोणाला माहिती होतं आलियाचं लग्न देखील रणबीरसोबत होईल. 

आलिया स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण तिला बालपणीच प्रेम मिळालं आणि आता ती आता आई होणार आहे.  वयाच्या 29 व्या वर्षी आलियाने कलाविश्वात स्वतःचा ठसा उमटवला आहे. 

आता आलिया 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात आलिया महत्त्त्वाची भूमिका बजावणार आहे. बॉलिवूडनंतर आलिया 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.