रात्री उशिरानं आलिया लगबगीत निघाली कुठे, बांगड्या - टिकली विसरली का? 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या लग्नापासून चर्चेत आहे

Updated: Apr 28, 2022, 05:48 PM IST
रात्री उशिरानं आलिया लगबगीत निघाली कुठे, बांगड्या - टिकली विसरली का?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या लग्नापासून चर्चेत आहे. आलिया भट्टला रविवारी रात्री उशिरा मुंबईती पापाराझींनी कैद केलं. या काळात अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत आणि तिचा लूक चर्चेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत लोकांना एवढ्या रात्री आलिया भट्ट कुठे स्पॉट झाली हे जाणून घ्यायचं आहे.

आलिया भट्टचा लग्नानंतरचा लूक
खंरतर, लग्नानंतर लगेचच कामाच्या कमिटमेंटमुळे आलिया आणि रणबीर सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत आलिया भट्ट एका अॅड शूटसाठी पोहोचली होती. यादरम्यान निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. आलियाची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते आणि पापाराझीही तेथे उपस्थित होते. यादरम्यान आलियाच्या एका चाहत्याने तिला एक गिफ्टही दिलं. जे आलियाने खूप आनंदानं स्वीकारलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया शूटिंगसाठी घराबाहेर पडली
यावेळी आलिया भट्ट अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. लग्नानंतरच्या लूकमध्ये सिंदूर आणि बिंदीशिवाय आलियाची खूप चर्चा होत आहे. यासोबतच, रणबीर कपूरही त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मुंबईबाहेर पडला आहे. तर आलिया सध्या घरी एकटी आहे.