शशी कपूर यांच्या नातीने पार केल्या बोल्डनेसची हद्द..करिना, करिश्मा कपूरही तिच्यापुढे आहेत फिक्या

आलिया भट्ट आता आलिया कपूर झाली असली तरी आम्ही बोलत आहोत ते दुसऱ्याच आलियाबद्दल. दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची नात आलिया कपूर सध्या तिच्या बोल्ड फोटोजमुळे चर्चेत आहेत. 

Updated: Apr 17, 2022, 02:37 PM IST
शशी कपूर यांच्या नातीने पार केल्या बोल्डनेसची हद्द..करिना, करिश्मा कपूरही तिच्यापुढे आहेत फिक्या title=

मुंबईः आलिया भट्ट आता आलिया कपूर झाली असली तरी आम्ही बोलत आहोत ते दुसऱ्याच आलियाबद्दल. दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची नात आलिया कपूर सध्या तिच्या बोल्ड फोटोजमुळे चर्चेत आहेत. 

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचाच बोलबाला आहे. अनन्या पांडे असो किंवा शनाया कपूर, सारा अली खान असो किंवा सुहाना खान. सर्वच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र आता असं एक नाव समोर आलं आहे जे पाहून तुम्ही म्हणाल या सर्वांना ही एकटीच भारी पडेल. 

आम्ही बोलतोय आलिया कपूरबद्दल. आलिया ही शशी कपूर यांची नात आहे. शशी कपूर यांना तीन मुलं आहेत. करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर. या तिघांनाही बॉलिवूडमध्ये फारसं आपलं नाव कमावता आलं नाही. तसंच यांची मुलंही कधी या इंडस्ट्रीकडे फिरकली नाहीत. 

मात्र लंडनस्थित करण कपूर यांची मुलगी आलिया सध्या तिच्या बोल्ड फोटोजमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमधून असं दिसतंय की आलिया कपूरही करिना आणि करिश्मा कपूरपेक्षा काही कमी सुंदर नाही. आलियाचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत

आलियाचे वडील म्हणजे करण कपूर यांनी बॉलिवूडला रामराम ठोकत लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. आलियाही लंडनमध्ये लहानाची मोठी झाली. तिचं सर्व शिक्षणही लंडनमध्येच झालं.

 

 असं असलं तरी आलियाची कपूर कुटुंबासोबत चांगली अटॅचमेंट आहे. करिना आणि करिश्मासोबतचं तिचं बाँडिंग खूपच छान आहे. तैमूरच्या जन्मानंतर आलिया पतौडी पॅलेसमध्ये झालेल्या एका गेट टुगेदर कार्यक्रमातही सहभागी झाली होती.