मुंबई : फक्त बॉलिवूडमध्येचं नाही तर सर्वत्र अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबात लग्नाच्या तयारीच्या हलचाली दिसून येत आहेत. पण अद्याप दोन्ही कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारची आली नाही. पण दोघांचं लग्न 14 एप्रिल रोजी होणार असल्याचं समोर येत आहे..
रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला असताना, त्यांच्या कपड्यांबद्दल देखील अनेक जण विचारत आहेत. कोणत्या फॅशन डिझायनरच्या लेहेंग्यामध्ये आलिया, रणबीरसोबत सप्तपदी घेणाार? अशा अनेक चर्चा रंगत आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणप्रमाणेच आलिया भट्ट देखील सब्यसाची वधू बनणार आहे. फॅशन डिझायनर सब्यसाचीचा लेहेंगा घालून आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत सप्तपदी घेणार असल्याचं कळत आहे.
यापूर्वी, कतरिना कैफ-विकी कौशल, करिश्मा तन्ना, मौनी रॉय-सूरज नांबियार, प्रियांका चोप्रा-निक जोनास, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, अनुष्का शर्मा-विराट कोहली, पत्रलेखा पॉल-राजकुमार राव यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या खास दिवशी सब्यसाचीची निवड कपड्यांसाठी केली.
अशा परिस्थितीत आलियाही तिच्या लग्नात सब्यसाचीचा लेहेंगा घालेल असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. त्यामुळे लग्नाच्या कपड्यांसाठी कोणत्या फॅशन डिझायनरला निवडते याकडे तिच्या सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.