close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आलियाचं पहिलं पंजाबी गाणं प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे.

Updated: Aug 13, 2019, 06:28 PM IST
आलियाचं पहिलं पंजाबी गाणं प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली 'करणची स्टुडंट...' सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. फक्त अभिनय क्षेत्रातच नाही तर तिने गायनात सुद्धा पदार्पण केले आहे. आलिया आणि पंजाबी गायक द दूरबीन यांचं 'प्राडा' गाणं प्रदर्शित झालं आहे. गाणं प्रदर्शित होताच गूगलवर ट्रेंड करत आहे. काहीदिवसांपूर्वी तिने गाण्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. 

सध्या आलिया तिच्या आगामी चित्रपटांमुळे फार व्यस्त आहे. 'ब्रम्हास्त्र' चित्रपटानंतर ती 'सडक २' चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहे. 'सडक २' चित्रपटाच्या माध्यमातून ती वडील महेश भट्ट आणि बहिण पुजा भट्टसोबत काम करताना दिसणार आहे.