Pushpa 2 साठी अल्लू अर्जुनने घेतली इतके कोटी, फी ऐकून चाहते हैराण

Pushpa 2  सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सूकता. पाहा कधी होणार रिलीज.

Updated: Aug 29, 2022, 08:59 PM IST
Pushpa 2 साठी अल्लू अर्जुनने घेतली इतके कोटी, फी ऐकून चाहते हैराण title=

मुंबई : सुपरहिट पुष्पा (pushpa 2) सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई तर केलीच पण प्रेक्षकांना तो खूपच आवडला. सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika mandanna) यांनी या सिनेमात एकत्र काम केलं असून सिनेमाने मोठी कमाई केली आहे. 

चित्रपटातील डायलॉग सर्वाधिक चर्चेत राहिले. तर गाणी ही खूप गाजली. (Pushpa Movie Songs) त्यामुळे सिनेमाला चांगलं यश मिळालं. आता प्रेक्षक याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरु होणार आहे.

'पुष्पा द राईज' नंतर आता पुढचा भागाचं नाव 'पुष्पा द रुल' असं असणार आहे. अल्लू अर्जुनने पुष्पा 2 साठी मोठी रक्कम घेतली आहे. या सिनेमासाठी त्याने तब्बल 125 कोटी रुपये घेतले आहेत. सुकुमारने 50 कोटी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना 5 कोटी घेतले आहेत. जानेवारी महिन्यात चित्रपट रिलीज होणार आहे. (pushpa 2 release date)

पुष्पा द राइज हा सिनेमा 21 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. तेलगू, हिंदीसह अनेक भाषेत तो रिलीज झाला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर सगळीकडे पुष्पाचीच क्रेझ पहायला मिळत होती. त्यामुळे आता दुसऱ्या भागाची उत्सूकता आहे.

सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) सिनेमातील त्याच्या भूमिकेमुळे आणखीनच प्रकाश झोतात आला. त्याच्या फॅन फॉलोईंग मध्ये ही मोठी वाढ झाली आहे.