तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? युझरवर भडकली मानसी नाईक

यापुढे मानसी नाईकवर कमेंट करताना युझर्स दोन वेळा विचार नक्की करतील

Updated: Apr 28, 2021, 10:27 AM IST
तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? युझरवर भडकली मानसी नाईक

मुंबई : आपला अभिनय, नृत्य यासोबतच खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री मानसी नाईक चर्चेत असते. नुकतंच तिचं लग्न झालं आहे. मराठी कलाकारांना कधी कधी कामासोबतच खासगी आयुष्यामुळे ट्रोल केलं जातं. काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. (Manasi Naik Angry on Trollers who using abusive language during live Session ) पण काही कलाकार जे मानसी नाईकसारखे आहेत. ते या युझर्सला सडेतोड असं कडक शब्दात उत्तर देतात. शिवीगाळ करणाऱ्या एका युझरला मानसीने चक्क लाईव्ह सेशलमध्ये उत्तर दिलं आहे. 

मानसीने एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. एका युझरने मानसीच्या पोस्टवर घाणेरड्या कमेंट केल्या होत्या. मानसीने या युझरला लाईव्ह सेशलमध्ये उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, 'तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात त्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते काम करतात. त्या त्यांच्या हिमतीवर जगतात. प्रामाणिकपणे काम करतात. त्या स्त्रिया तिथे का आल्या असं तुम्हाला वाटत?तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करून खा. पण दुसऱ्यांना अशा भाषेत शिव्या घालून काय मिळतं?' असे अनेक प्रश्न विचारत तिने त्या युझरला सुनावलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

मानसीने काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली आहे. परंतु, तिच्या लग्नावरुनही तिला अनेक जणांनी ट्रोल केलं होतं. तुला मराठी मुलगा भेटला नाही का? असं तिला विचारण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकर यालाही ट्रोल करण्यात आलं होतं. परंतु, त्या युझरला वास्तवाचं भान करून देत शशांकने त्याला चांगलंच सुनावलं होतं. अशा युझर्सचा बेशिस्तपणा आम्ही सहन करून घेणार नाही, असं म्हणत त्याने युझरला खडसावलं होतं.मानसी नाईकची अनेकदा बॉलिवूडमधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत तुलना करण्यात आली.