Pushpa मधील Allu Arjun ची सिग्नेचर स्टेप शेहनाजकडून केली कॉपी? व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही...  

Updated: Feb 5, 2022, 10:29 AM IST
Pushpa मधील Allu Arjun ची सिग्नेचर स्टेप शेहनाजकडून केली कॉपी? व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : 'पुष्पा : द राइज' या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनची आजही देश-विदेशात चर्चा होत आहेत. अल्लू अर्जुनच्या अभिनयापासून या सिनेमातील त्याच्या शैलीचं कौतुक झालं.  त्याचा ऍटिट्यूड आणि स्टाइलही चाहत्यांनी खूप आवडली. 'पुष्पा'मधील अल्लू अर्जुनच्या हावभावाने चाहते आणि प्रेक्षक प्रभावित झाले. त्याची सिग्नेचर स्टेप तर अनेकांनी कॉपी केली. पण ही स्टेप नक्की आली कुठून असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

अल्लू अर्जुनची ही स्टेप अभिनेत्री शेहनाज गिलकडून कॉपी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. शेहनाजचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये शेहनाज आनंदी दिसत आहे. बिग बॉस 13 ची स्पर्धक असलेल्या शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज गिलला अल्लू अर्जुनसारखीचं स्टेप करताना दिसत आहे... 

नुकताचं शेहनाजला 'बिग बॉस 15' मध्ये पोहोचली होती. यावेळी तिने अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली दिली. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पुर्णपणे कोलमडली होती. आात शेहनाज स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.