#Me Too वर येतोय सिनेमा, संस्कारी बाबू आलोकनाथ साकारणार न्यायाधीशाची भूमिका

#Me Too वादळावर लवकरच सिनेमा चित्रीत करण्यात येणार आहे. सिनेमात कोणत्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार हे हळू-हळू समोर येत आहे. 

Updated: Mar 2, 2019, 11:38 AM IST
#Me Too वर येतोय सिनेमा, संस्कारी बाबू आलोकनाथ साकारणार न्यायाधीशाची भूमिका

मुंबई : #Me Too मोहीमेचे वादळ  अद्यापही शमलेले नही. #Me Too मोहीमे अंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. या #Me Too वादळावर लवकरच सिनेमा चित्रीत करण्यात येणार आहे. सिनेमात कोणत्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार हे हळू-हळू समोर येत आहे. #Me Too मोहीमेच्या जाळ्यात अडकलेले जेष्ठ अभिनेते आलोक नाथ सिनेमात न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लेखिका विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले होते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने आलोक नाथ यांच्या विरोधात तब्बल सहा महिने असहयोगाचे आदेश दिले. याचा अर्थ सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही कलाकाराने आलोक नाथ यांच्यासोबत काम न करण्याचे सक्त आदेश दिले होते.

#Me Too मोहीमेखाली तयार होणाऱ्या सिनेमाचे दिग्दर्शन नासिर खान करणार आहेत. याप्रकरणी लेखिका विनता नंदा यांच्या कडे विचारणा करण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या, 'सध्या देशात जी स्थिती चालू आहे त्यानंतर मला या विषयावर कोणतेही भाष्य करायचे नाही. आलेकनाथ काय करतील याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. सध्या मी देश हिंसामुक्त होण्यासाठी देवाकडे प्रर्थणा करत आहे.' 

विनता यांच्यावर 19 वर्षांपूर्वी अलोकनाथ यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप दाखल झाले होते. त्यावेळेस विनता आणि आलोकनाथ सिनेमात एकत्र काम करत होते. पण तेव्हा आलेकनाथांनी त्यांच्यावर लागलेले आरोप फेटाळून लावले. 2018 मध्ये सुरु झालेले हे #Me Too वादळ अह्यापही शमलेले नाही. #Me Too चळवळी अंतर्गत अनेक कलाकार,राजकारणीमंडळी यांच्यावर आरोप झाले. #Me Too चळवळीत साजिद खान, अनु मलिक आणि कैलाश खेर यांच्या व्यतिरिक्त अनेक दिग्गज मंडळींची नावे आहेत.